जंगलांच्या आगी टाळण्यासाठी... ----------------------------- मानवी जीवनाशी अतूट नाते असलेल्या वन्य जीवनाची हानी प्रामुख्याने मानवाकडूनच होत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. एका बाजूला शासन आणि समाजातले काही घटक वन संवर्धनाचे जोरदार प्रयत्न करीत असतानाच व बनाचा नाश होण्यासही माणूसच कारणीभूत होत असल्याचे चित्र दुसर्या बाजूला दिसत आहे. जगातील सर्वात मोठं जंगल म्हणून ओळखल्या जाणार्या ब्राझीलमधील अॅमेझॉन जंगलाला नोव्हेंबर 2019 आणि मे 2020 मध्ये भीषण आगी लागल्या. ही बातमी भारतात फारशी कुणी मनावर घेतली नाही. कारण या बातमीला म्हणावी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. जवळपास तीन आठवडे हे जगातलं सर्वात मोठं जंगल जळत राहिलं. एखाद्या जंगलाला यापूर्वी कधीच नैसर्गिक आग लागली नाही असं नाही. जंगलात वणवे लागतात. अॅमेझॉनला जंगलाला लागलेली आग ही सर्वांपेक्षा मोठी असण्याचं कारण हे की पृथ्वीवर ऑक्सिजन निर्माण करणारा एक अतिशय मोठा स्रोत नष्ट होत चालला आहे. अॅमॅझॉनचं जंगल ही जगातली सर्वात मोठी परिसंस्था आहे. प्राणी आणि वनस्पतींच्या अनेक अतिदुर्मिळ प्रजाती फक्त अॅॅमेझॉनमध्ये आढळतात, ज्या ...
पोस्ट्स
एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
दुसरे महायुद्ध, काँग्रेसचे धोरण आणि सुभाषबाबू ------------------------------------ श्रीराम ग. पचिंद्रे ----------------- 3 सप्टेंबर 1939 या दिवशी दुसरे महायुद्ध सुरू झाले. भारत हा महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने असल्याचे काँग्रेसने जाहीर केले. सुभाषचंद्र बोस हे 1938 मध्ये हरिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे सुभाषबाबूंना अध्यक्षपदाचा राजीनामा देणे भाग पडले होते. 1939 मध्ये त्रिपुरी अधिवेशनाचे सुभाषबाबू पुन्हा अध्यक्ष होण्याच्या तयारीत होते. परंतु महात्मा गांधींना त्यांची कार्यपद्धती न आवडल्याने त्यांनी आपल्याला आवडणार्या व आपल्या आज्ञा निमूटपणे पाळणार्या पट्टाभिसीतारामय्या यांना काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषचंद्र बोस यांच्याविरुद्ध उभे केले. कधी नव्हे ती निवडणूक लागली आणि गांधीजींचा पाठिंबा असूनही पट्टाभिसीतारामय्या पराभूत झाले व सुभाषबाबू 203 मतांनी निवडून आले. महात्माजींनी हा स्वतःचा पराभव मानला. तेव्हापासून ते सुभाषबाबूंच्या विरोधात गेले. 3 मे 1939 या दिवशी सुभाषबाबूंनी कोलकत्यातील एका जाहीर सभेत फॉरवर्ड ब्लॉकच्या स्थापनेची घोषणा केली. काँग्रेसम...