पोस्ट्स

  ------------------------------------------------------------------------------------------------ धगधगते क्रांतिपर्वः सरदार अजितसिंग -----------------------------  श्रीराम ग. पचिंद्रे, ज्येष्ठ संपादक, साहित्यिक, कवी. 7350009433 सरदार भगतसिंग यांना क्रांतिकार्याची प्रेरणा देणारे, इटलीमध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना करून सैन्य गोळा करून नंतर ती सेना सुभाषचंद्र बोस यांच्या हाती सोपवणारे आयुष्यभर परागंदा राहून ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारणारे थोर क्रांतिकारक सरदार अजितसिंग यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्याच दिवशी प्राण सोडले.  ----------------------------------------------------------- आपले सारे जीवन आगीशी खेळण्यात आणि जन्मभर ब्रिटिश सत्तेशी संघर्ष करण्यात व्यतीत केलेल्या महान क्रांतिकारक सरदार अजितसिंग यांनी 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालेले पाहूनच आपला देह ठेवला. आज त्यांचा 75 वा पुण्यस्मरण दिन आहे. सरदार अजितसिंग हे हुतात्मा भगतसिंग यांचे काका होत. भगतसिंग यांना क्रांतीची प्रेरणा देणार्‍या अजितसिंग यांचा जन्म देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच झाला आहे अश...
 जंगलांच्या आगी टाळण्यासाठी... ----------------------------- मानवी जीवनाशी अतूट नाते असलेल्या वन्य जीवनाची हानी प्रामुख्याने मानवाकडूनच होत असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. एका बाजूला शासन आणि समाजातले काही घटक वन संवर्धनाचे जोरदार प्रयत्न करीत असतानाच व बनाचा नाश होण्यासही माणूसच कारणीभूत होत असल्याचे चित्र दुसर्या बाजूला दिसत आहे. जगातील सर्वात मोठं जंगल म्हणून ओळखल्या जाणार्या ब्राझीलमधील अ‍ॅमेझॉन जंगलाला नोव्हेंबर 2019 आणि मे 2020 मध्ये भीषण आगी लागल्या. ही बातमी भारतात फारशी कुणी मनावर घेतली नाही. कारण या बातमीला म्हणावी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. जवळपास तीन आठवडे हे  जगातलं सर्वात मोठं जंगल जळत राहिलं. एखाद्या जंगलाला यापूर्वी कधीच नैसर्गिक आग लागली नाही असं नाही. जंगलात वणवे लागतात. अ‍ॅमेझॉनला जंगलाला लागलेली आग ही सर्वांपेक्षा मोठी असण्याचं कारण हे की पृथ्वीवर ऑक्सिजन निर्माण करणारा एक अतिशय मोठा स्रोत नष्ट होत चालला आहे. अ‍ॅमॅझॉनचं जंगल ही जगातली सर्वात मोठी परिसंस्था  आहे. प्राणी आणि वनस्पतींच्या अनेक अतिदुर्मिळ प्रजाती फक्त  अ‍ॅॅमेझॉनमध्ये आढळतात, ज्या ...
 दुसरे महायुद्ध, काँग्रेसचे धोरण आणि सुभाषबाबू ------------------------------------ श्रीराम ग. पचिंद्रे ----------------- 3 सप्टेंबर 1939 या दिवशी दुसरे महायुद्ध सुरू झाले. भारत हा महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने असल्याचे काँग्रेसने जाहीर केले. सुभाषचंद्र बोस हे 1938 मध्ये हरिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे सुभाषबाबूंना अध्यक्षपदाचा राजीनामा देणे भाग पडले होते. 1939 मध्ये त्रिपुरी अधिवेशनाचे सुभाषबाबू पुन्हा अध्यक्ष होण्याच्या तयारीत होते. परंतु महात्मा गांधींना त्यांची कार्यपद्धती न आवडल्याने त्यांनी आपल्याला आवडणार्या व आपल्या आज्ञा निमूटपणे पाळणार्या पट्टाभिसीतारामय्या यांना काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुभाषचंद्र बोस यांच्याविरुद्ध उभे केले. कधी नव्हे ती निवडणूक लागली आणि गांधीजींचा पाठिंबा असूनही पट्टाभिसीतारामय्या पराभूत झाले व सुभाषबाबू 203 मतांनी निवडून आले. महात्माजींनी हा स्वतःचा पराभव मानला. तेव्हापासून ते सुभाषबाबूंच्या विरोधात गेले. 3 मे 1939 या दिवशी सुभाषबाबूंनी कोलकत्यातील एका जाहीर सभेत फॉरवर्ड ब्लॉकच्या स्थापनेची घोषणा केली. काँग्रेसम...

कवी कधी होत नसतो म्हातारा...

इमेज
माझ्यासमोर एक गंभीर प्रश्न पडलेला आहे. प्रेमकविता लिहायची असेल, तर कवी तरुणच असला पाहिजे का? तसेच तो सुंदरही असायला हवा का?- हा पश्नच अप्रस्तुत आहे, असं आपण निश्चितच म्हणाल. पण नाही! त्याचं असं झालं की, एका कविसंमेलनाच्या आयोजकांनी फक्त तरुण कवींनाच प्रेमकविता सादर करण्यासाठी आमंत्रित केलं. तरुण श्रोत्यांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी कवीही तरुण (आणि सुंदर, आकर्षक) हवेत, असं त्यांचं म्हणणं होतं. मग असं असेल तर, आजवर अनेक वयस्कर, प्रौढ, वृद्ध कवींनी लिहिलेल्या विलक्षण तरल, आशयघन, सुंदर कविता मोडीतच काढाव्या लागतील. खरंतर जी उत्कृष्ट कविता आहे, ती चिरतरुण असते. प्रेमकविता तर असतेच असते. ती तरुण कवीनं लिहिलेली असो, की, वृद्ध कवीनं. किंबहुना वृद्ध कवी जी प्रेमकविता लिहितो, ती अधिक प्रगल्भ, परिपक्व असते आणि तीच तरुणांना अधिक आवडते.  भा. रा. तांबे यांनी कविता लिहायला सुरुवात केली, तीच मुळी सत्तरीनंतर. पण त्यांनी त्यानंतर लिहिलेली  डोळे हे जुल्मी गडे रोखुनि मज पाहू नका जादुगिरी त्यात पुरी येथ उभे राहू नका ही कविता असो, की,  ते दूध तुझ्या त्या घटातले का अधिक गोड लागे न कळे किंवा न...
 श्री तुझे तेच माझे असू लागले... ------------------- श्रीराम ग. पचिंद्रे -------------- कविवर्य सुरेश भट यांच्या एका गझलेतील दोन शेर आहेतः लपंडाव माझा तुझा संपला तुझे तेच माझे असू लागले...  तुझ्या अंतरी कोणती वादळे मला हेलकावे बसू लागले...  पती आणि पत्नीच्या सहजीवनाचे मर्म सहजपणानं सांगणारे हे दोन अर्थपूर्ण शेर आहेत. ‘ती’ जेव्हा त्याची होते आणि ‘तो’ जेव्हा तिचा होतो, तेव्हा एकमेकांमध्ये जे काही नाते निर्माण झालेले आहे, ते शब्दांशिवायही प्रकट व्हायला लागते. दोघांना एकमेकांपासून काही लपवण्याची आवश्यकताच उरत नाही, कारण दोघांचे दोघांना आणि दोघांना दोघांचे असं होऊन जातं. लपंडाव केव्हा संपला हे दोघांनाही कळत नाही, ़इतक्या सहजपणे तो संपून जातो. हेच तर सहजीवनाचं मर्म आहे. एकमेकांवरील प्रगाढ प्रेम आणि विश्वास यावरच सहजीवनाचा आनंद अवलंबून असतो. घटस्फोट हा शब्द आपल्या माहीतही नाही, असाही एक काळ भारतात होता. एकदा मुलीचं लग्न लागलं आणि ती सासरी नांदायला गेली, की ती माहेरची पाहुणीच व्हायची, फक्त पाहुणी. बाकीचं तिचं जे काही व्हायचं, ते तिच्या नवर्‍याघरीच. ती जगली काय नि मेली काय, ते सास...